अरे माझे केस खुप गळतात रे , खुप कोंडा (Dandruff) झाला आहे , केस खुप कोरडे पडतात, केस पांढरे सुद्धा झालेत, रात्री झोप लागतच नाही, अचानक डोके दुखते , डोळ्यांची आग होते अशा अनेक गोष्टी आपण मित्राच्या /मैत्रिणीच्या ऐकतो आणि त्यावर काही ऐकीव उपायही सांगतो पण ते योग्य आहे का ?
आयुर्वेदाने दिनक्रम कसा असावा, काय करावे , शरिराची शुद्धी कशी करावी याचे वर्णन केले आहे , ह्यात डोक्याला तेल लावणे, चूर्णाने डोके धुणे याचा उल्लेख केला आहे .पण काही वेळेस पुरेसा वेळच मिळत नाही अशी ओरड असते.त्या साठी आयुर्वेदाने शिरोधारा उपचार पद्धत सांगितले आहे.
शिरोधारा
कपाळाच्या मध्यभागी औषधी द्रव्याची (तैल, ताक, दुध ) धार सतत काही काळ धरून ठेवली जाते त्याला शिरोधारा म्हणतात.
तैलधारा
तैलधारा म्हणजे सिद्ध केलेल्या तेलाची धार कपाळावर धरली जाते .
◆केस गळणे , कोंडा होणे , केस दुभंगणे , डोक्याच्या ठिकाणी आग, डोके दुखणे , लक्षणे कमी होतात .
◆गायन करणारे किंवा ज्यांना सतत बोलवे लागते अशा व्यक्तीना आवाजाशी संबधी समस्या असल्यास तैलधारा उत्तम
◆ज्यांना पक्षाघात, मेंदूचे विकार ह्यात अंत्यत फायदेशीर
◆मनाला व बुद्धीला चालणा देऊन ताण कमी करणारी अजब चिकित्सा
◆निद्रानाश (झोप न येणे) ह्यावर वरदान
दुग्ध धारा
गाईचे दुध काही औषधी द्रव्यासोबत सिद्ध करुन कपाळावर ठराविक काळ धरली जाते त्याला दुग्ध धारा म्हणतात.
◆डोके किंवा शरिराची आग होत असल्यास धारा केल्याने थंडावा मिळतो.
सतत संगणक (Computer) समोर बसुन काम केल्याने डोळे , मान दुखणे यावर विशेष उपयोग.
◆मानसिक आजार, उत्साह नसणे , सतत विचार, मानसिक तणाव ह्या लक्षणात उपयुक्त.
◆उच्च रक्तदाब (High bloodpressure) कमी करतो.
तक्र धारा
ताकाची धार कपाळावर ठराविक काळ धरून ठेवणे याला तक्र धारा म्हणतात .
◆शरिरातील उष्णतेने हात व पायाच्या तळव्याची आग होत असल्यास तक्र धारा केल्यास आग शांत करून थंडावा निर्माण करते.
◆शरिरातील मर्मासाठी उपयुक्त.
◆संधीच्या (Joint ) ठिकाणी असणारी जडता कमी करते.
◆भूक न लागणे , सतत उलटीची इच्छा होते ही लक्षणे कमी करून भूक वाढवते, पचन सुधारते .
◆शरिरातील अंतस्त्रावी ग्रंथीना चालना देऊन रोगप्रतिकार शक्ती वाढवते.
Visit www.meddna.com for booking appointment with Dr. Abhijeet Raut.
Leave a Reply